रायसोनी पब्लिक स्कूलला जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत “दूहेरी मुकुट”

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अनुभूती स्कूल येथे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेत जी. एच. रायसोनी इस्टीट्युट संचालित सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या १४ वर्षाआतील वयोगटामध्ये यश हेमनाणी, निरव जैन, विहान मुथा, मिहीर्सिंग मोर्या, विराज जैन या विध्यार्थ्यानी द्वितीय स्थान प्राप्त केले, तर मुलींमध्ये १९ वर्षाआतील वयोगटात राधिका सोनी, तान्या चैत्रानी, विधी सोनी, कनक सोनवणे, अनया अहुजा या मुलींनी तृतीय स्थान प्राप्त करत यश संपादन केले.

याबद्दल या विद्यार्थ्यांचा स्कूलच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी व मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन विजयी विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या दरम्यान उपस्थित विध्यार्थी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी नमूद केले कि, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका  राजुल रायसोनी तसेच क्रीडाशिक्षक संजय चव्हाण, किशोरसिंग ठाकूर व सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यासह सर्व पालक या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच या यशामागे या खेळाडूंनी घेतलेली मेहनत, त्यांच्यामध्ये असणारी कौशल्ये व क्रीडा शिक्षकांचे त्यांना लाभलेले उत्तम मार्गदर्शणामुळेच विद्यार्थ्यांना हे यश प्राप्त झाले असे त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा शिक्षणालाही महत्त्वपूर्ण स्थान देणारी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व शारीरिक गुणवत्तेस सतत प्रेरणा व चालना देणाऱ्या सी.बी.एस.ई.बोर्डच्या जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे विध्यार्थ्यांच्या या यशामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

Protected Content