गरजूंना स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्य द्या : अल्पसंख्याक सेवा संघटनेची मागणी

 

जळगाव, प्रतिनिधी । मागील एक महिन्यापासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच काही दिवसातच पवित्र रमजान ईद असल्याने शासनाने त्वरित जिल्ह्यातील स्वस्त धन्य दुकानात अशा गरजूंना मोफत धान्य उपलब्ध करुन  द्यावे अशी मागणी अल्पसंख्यांक सेवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनाचा आशय असा की,  मागील एक महिन्यापासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे  सामान्य माणूस  व गरिबांना बेजगारीमुळे उपासमारीची वेळ आली. अवघ्या काही दिवसावर पवित्र रमजान ईद असल्यामुळे   शासनाने त्वरित जिल्ह्यातील स्वस्त धन्य दुकानात मोफत धान्य उपलब्ध करुन  द्यावेत. निवेदनावर प्रदेशाध्यक्ष जहाँगीर ए खान, प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष याकुब दाऊद खान, जिल्हा अध्यक्ष सलीम इनामदार, उपाध्यक्ष अकबर बुधन काकर, महीला जिल्हा अध्यक्ष आयेशा बी मण्यार, शकील शेख, अब्दुल रऊफ शेख,यांच्या  उपस्थित अल्पसंख्यांक सेवा संघ जळगाव यानी केली आहे. निवेदन गृह शाखा नायब तहसीलदार रवींद्र शिवाजी मोरे  यांना देण्यात आले आहे.

 

Protected Content