जळगावात शासकीय धान्य गोदामातून ९ गव्हाचे पोते लंपास; दोघांना अटक

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी पोलीस हद्दीत असलेले महाराष्ट्र राज्य वखार महामंडळातून ५० किलो वजनाचे गव्हाचे ९ पोते चोरणाऱ्या दोन भामट्यांना एमआयडीसी पोलीसांनी यश आले असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गव्हाच्या गोदाममध्यून १४ एप्रिल रोजी सकाळी १ ते दुपारी २ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गव्हाचे ९ पोते लंपास केल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला होता. याप्रकरणी साहेबराव चौधरी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीसांनी चक्रे फिरवत संशयित आरोपी दिनकर रोहिदास चव्हाण (वय-२४) रा. सुप्रिम कॉलनी आणि उमेश उर्फ साई सोनाजी आठे (वय-२६) रा. सुप्रिम कॉलनी यांना मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास अटक केली. दोघांनी चोरी केलेले गव्हाचे ९ पोते हस्तगत केली.

दोन्ही आरोपी रेकॉर्डवरी गुन्हेगार
सदरचे दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याबाबत माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांचे मार्गदर्शनाखाली आरोपी यांना काल अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील मुद्देमाल हा त्यांनी एमआयडीसी परिसरातील सेक्टरमध्ये असलेल्या बंद असलेल्या टायटन कंपनीच्या मागील बाजूस लपवून ठेवला होता. आज सकाळी त्यांच्याकडून सदरच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपींना न्यायालयात हजर केले. दोघांना मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड मिळालेली आहे. सदरची कारवाई ही पोउनि विशाल वाठोरे, सहाय्यक फौजदार संभाजी पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, महेंद्रसिंग पाटील, सतीश गरजे, इम्रान सय्यद, गोविंदा पाटील, शुद्धोधन ढवळे, सचिन पाटील, योगेश बारी यांनी केली आहे.

 

Protected Content