Accident : मध्यप्रदेशातील बस कर्की फाट्यावर उलटली; वाहक ठार, १५ प्रवाशी जखमी

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उज्जैनकडून शेगावकडे जाणारी बस आज सांयकाळी कर्की फाट्यावर उलटल्याने वाहक हा जागीच ठार झाला असून १५ जण जखमी झाले आहे. जखमीतील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक रवाना झाले आहे.

 

याबाबत माहिती अशी की, मध्यप्रदेशातील उज्जैन येवून शेगावला जाणारी मध्यप्रदेश परिवहन मंडळाची बस क्रमांक (एमपी १३ पी १३४३) ही आज सांयकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की फाट्याजवळून जात असतांना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस उलट्या दिशेने मागे जात थेट शेतात जावून उलटली. यात अपघातात वाहक हा जागीच ठार झाला आहे. तर १५ प्रवाशी जखमी झाल्याचे वृत्त असून यातील  दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

 

जखमी झालेल्या रूग्णांना तातडीने शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरू आहे. दरम्यान मयत आणि जखमींचे नावे अद्याप माहिती मिळालेली नाही.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!