बेकायदेशीर गुरे बांधणाऱ्या तिघांवर नशिराबाद पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद गावातील निमजाय मंदीराजवळील स्मशानभूमीजवळ बेकायदेशीर बांधलेली एक गाय व पाच गोऱ्हे यांची सुटका करण्यात आली असून याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील निमजाय मंदीराजवळील स्मशानभूमीजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये बुधवारी ६ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास एक गाय आणि चार गोऱ्हे यांनी विनापरवाना बांधुन ठेवले असल्याचे नशिराबाद पोलीसांना आढळून आले. याची दखल घेत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी सुचना देत पोलीस कर्मचाऱ्यांना होमगार्डसह पथकाला रवाना केले. नशिराबाद पोलीसांनी कारवाई करत ३७ हजार रूपये किंमतीचे एक गाय आणि चार गोऱ्ह्यांची सुटका करण्यात आली. या कारवाईत असलम खान अयाज खान (वय-२६), जलीम शेख मुसा कुरेशी (वय-४५) आणि हनीफ शेख (वय-२९) रा. नशिराबाद ता.जि.जळगाव या तिघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक हेमंत मिटकरी यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन देशमुख करीत आहे.

Protected Content