गावठी दारूच्या भट्टीवर धाड ; २ आरोपी पकडले

 

रावेर,  प्रतिनिधी । तालुक्यातील खिरवड गावाजवळच्या नेहाता रोडवरील नाल्याकाठी असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकून पोलिसांनी २ आरोपींना अटक करीत या कारवाईत ८८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

या आरोपींविरोधात गुन्हा र न. 69/2020 , दारू बंदी कलम 65 फ ब क प्रमाणे पोकॉ तुषार मोरे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुतरू कोंगे ( 68) व शेखर कोंगे ( 30, दोघे रा खिरवड) अशी या आरोपींची नावे आहेत . 8000/- रुपायांचे गुळमोह मिश्रीत कच्चे रसायन 13 कॅन व 600ली रसायन किमत अंदाजे 400 रुपये , 30 लिटर पक्के गुलमोह मिश्रित रसायन , 400 रुपये किमतीची 10 लिटर गावठी तयार दारू 10 लिटर कॅनने भरलेली ; असा एकूण 8800 रुपयांचा माल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले

पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि शितलकुमार नाईक, पोहवा. नारेकर, पो कॉ सुरेश मेढे, तुषार मोरे, मनोज म्हस्के , निलेश लोहार, पुरुषोत्तम पाटील, महेंद्र पाटील यांनी ही कारवाई केली.

Protected Content