लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची भूमिका ठरविण्यासाठी जिल्हा बैठकीचे आयोजन

jalgaon Shivsena

jalgaon Shivsena

जळगाव (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या मनातील भावना जाणून घेत विचारविनिमय करण्यासाठी शिवसेनेची तातडीची जिल्हा बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला जिल्हयातील सर्व तालुक्यातील सर्व शिवसेना शहरप्रमुख, तालुका प्रमुख, विधानसभा क्षेत्र प्रमुख व उपजिल्हा प्रमुख यांच्यासह शिवसैनिकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ व चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

 

शिवसेनेची जिल्हा बैठक बैठक 1 एप्रिल 2019 रोजी (सोमवार) दुपारी 2 वाजता सरदार वल्लभभाई पटेल भवन , डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केट जवळ आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीला शिवसेना, युवासेना, महिला आघाड़ी, एस. टी. कामगार सेना, शिक्षक सेना, ग्राहक स्वसंरक्षण कक्ष यांचे जिल्हाप्रमुख,उपजिल्हाप्रमु , विधानसभा क्षेत्र प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख , उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख ,उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख ,त्या- त्या गावचे बूथप्रमुख, ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, सदस्य व विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व संचालक तसेच लोकप्रतिनिधी सर्व आजी – माजी नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार यांची उपस्थिती असणार आहे.

 

सदर बैठकीस शिवसेना उपनेते तथा सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील, जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत तसेच रावेर लोकसभा संपर्क प्रमुख विलास पारकर (मुंबई) हे मार्गदर्शन करणार आहेत. तर प्रमुख अतिथि म्हणून माजी आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील,जिल्हा संघटक ज्ञानेश्वर जळकेकर महाराज हे उपस्थित राहणार आहेत, तरी बैठकीला वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ व चंद्रकांत पाटील, महानंदा पाटील, जळगाव महानगर प्रमुख शरद तायडे यांनी केले आहे.

Add Comment

Protected Content