नांद्रा बुद्रुक येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । हळदीच्या कार्यक्रमासाठी आई वडील गेल्याचे पाहून तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथे घडली. याप्रकरणी तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, योगेश रमेश तायडे (वय-३५) रा. नांद्रा ता.जि.जळगाव हा मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करत होता. त्यातच त्याला काही दिवसांपासून दारूचे पिण्याच्या आहारी गेला होता. आज शेजारी राहत असलेल्या नातेवाईकांकडून हळदीचा कार्यक्रम होता. त्यामुळे योगेशची आई व वडील कार्यक्रमात गेले होते. घरात योगेश एकटाच होता घरी कुणीही नसताना योगेश याने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. काही वेळानंतर गल्लीतीलच काही नागरिकांना हा योगेश याने आत्महत्या केल्याचे दिसून आल्यानंतर आई-वडीलांनी आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी प्रशांत पाटील, किरण अगोने यांनी गावात जावून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content