बसस्थानक आवारात चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवशी तीन मंगलपोत लांबविल्या

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नवीन बसस्थानकात बसमध्ये चढतांना गर्दीचा फायदा घेत तीन महिलांच्या गळ्यातील मंगलपोत लांबविल्याची दिवसभरात नवीन बस स्थानक परिसरात घडली. दोन महिलांना हा प्रकार लागलीच लक्षात येताच त्यांना तुटलेली पोत मिळून आली. दरम्यान, नवीन बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळेच चोरटे अधिकच सक्रीय झाले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जिल्हापेठ पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील नवीन बसस्थानकात नेहमीच प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. बसमध्ये चढतांना याच गर्दीचा फायदा घेत लहान मुले महिलांच्या गळ्यातील किंवा त्यांच्या पर्समधील सोने चांदीचे दागिने लांबवित असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. दरम्यान, रविवारी २० ऑगस्ट रोजी दिवसभरात नवीन बस स्थानकामधून तीन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी व पोत लांबविल्याच्या घटना उघडकीस आल्या आहे. पोत ओढल्यानंतर महिलांना गळ्यातील पोत कोणीतरी ओढत असल्याचे लक्षात येताच त्यांनी पोत सुरखुप राहिली. तर एका महिलेच्या गळयातील पोत चोरण्यास चोरटे यशस्वी झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जिल्हापेठ पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.

Protected Content