घेतलेले पैसे मागण्यावरून एकावर चाकूने वार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावात पैशांच्या देण्याघेण्यावरून झालेल्या वादात राहणाऱ्या प्रौढाला महिलेसोबत असलेल्या तीघांनी बेदम मारहाण केली तर एकाने चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, अरूण भागवत भोई वय ४५ रा. नशिराबाद, जळगाव परिवारासह वास्तव्याला आहे. अरूण भोई याने गावातील चेतन येवले याच्याकडून काही उसनवारीचे पैसे घेतले होते. रविवारी ३१ मार्च रोजी रात्री १० वाजता अरूण भोई हे घरी असतांना मालती नन्नवरे आणि इतर तीन अनोळखी व्यक्ती आले. अरूण यांनी चेतन येवले यांच्याकडून घेतले पैसे मालती नन्नवरे यांनी मागितले. त्यावर मी ज्याच्याकडून पैसे घेतले त्यालाच परत करेल अशी अरूण भाई यांनी सांगितले. याचा राग आल्याने मालती नन्नवरे यांच्या सोबत आलेल्या तिघांनी बेदम मारहाण केली तर चाकूने वार करून जखमी केले. याप्रकरणी सोमवारी १ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता नशिराबाद पोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार हरीष पाटील हे करीत आहे.

Protected Content