धर्मरथ फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | धर्मरथ फाउंडेशन जळगावच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना शिवजयंतीचे औचित्य साधून पुरस्कार वितरीत करण्यात करण्यात आले.

 

धर्मरथ फाउंडेशनतर्फे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक/ क्रीडा सांस्कृतिक, खेळाडू व सामाजिक पुरस्कार आणि शिवव्याख्यान २०२२ जळगाव जिल्ह्यातील क्रीडा सांस्कृतिक व परंपरेचा वारसा जपत अग्रेसर राहण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने शिवजयंतीचे औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजना पाटील , उपमहापौर कुलभूषण पाटील , पोलीस अधिक्षक प्रवीण मुंडे , राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील , माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, केंद्रीय वखार महामंडळ अधीक्षक प्रशांत तायडे , क्रीडा अधिकारी सुजाता गुलाने या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार वाटप करण्यात आले

पुरस्कारार्थी- योगेश रामराव साळुंखे( क्रीडाशिक्षक मेहुनबारे चाळीसगाव), गणेश नारायण पाटील (क्रीडा शिक्षक पाचोरा), सुनील शामराव पाटील (क्रीडा शिक्षक पाचोरा), साजीद पठाण (सामाजिक जळगाव),भूषण परशुराम रायगडे (क्रीडा शिक्षक धरणगाव),संदेश हिरामण महानुभव (क्रीडा शिक्षक धरणगाव),विलास निंबा पाटील (क्रीडा शिक्षक जामनेर),महिंद्रा संभाजी पाटील ( क्रीडा शिक्षक जामनेर),दिपक कृष्णा चौधरी ( क्रीडाशिक्षक ),अंजली नाईक (उत्कृष्ट शिक्षिका जळगाव), अमिता निकम(उत्कृष्ट शिक्षिका जळगाव),सोनाली देविदास सोनवणे( सामाजिक व सांस्कृतिक औरंगाबाद),विजय तात्यासाहेब शितोळे ( क्रीडाशिक्षक चाळीसगाव),किशोर गजानन नेवे (सामाजिक जळगाव),प्रीती गोपाळ मिस्तरी (उत्कृष्ट शिक्षिका जळगाव),गौरी गणेश महाजन (उत्कृष्ट खेळाडू जळगाव),सन्मुख गणेश महाजन (उत्कृष्ट खेळाडू जळगाव),राहुल भागवत सूर्यवंशी ( जळगाव),भारती रविंद्र काळे (सामाजिक जळगाव),

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उल्हास ठाकरे व आभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी संतोष भितांडे, राजेश पाटील, साजीद पठाण, वेदांत नाईक, तन्मय राणे, मयूर देशमुख, सागर कुटुंबळे, रोहित कुटुंबळे यांनी कामकाज पाहिले.

Protected Content