सभापतींना बद्लींचे अधिकार द्या : ललिता पाटील (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | महाराष्ट्र विधानमंडळ पंचायतीराज समिती जिल्ह्याच्या तीन दिवशीय दौऱ्यावर आली आहे. या समितीचे अध्यक्ष  संजय रायमुलकर यांना पंचायत समितीस्तरावर येणा-या समस्या सोडवण्यासाची मागणी जळगाव पंचायत समितीच्या सभापती ललिता जनार्दन पाटील यांनी काल  निवेदनाद्वारे आहे.

 

 

निवेदनाचा आशय असा की,  पंचायत समिती स्तरावर विकास कामे करीत असताना तालुक्यातील गांवाना भेटी देणे समस्या जाणून घेणे करीता सभापती, उपसभापती व गट विकास अधिकारी यांना पंचायत समितीचे वाहन वापरत असताना इंधन खर्चाची मर्यादा अत्यंत अल्प आहे ती वाढुन मिळावी. सभापती यांचे दरमहा मानधन रु 10,000/- ऐवजी 20,000/- व उपसभापती यांना रु 8000/- ऐवजी 16,000/- मिळावे. मागील वर्षाचा पंचायत समिती  सेस अंत्यंत अल्प मिळाला व चालु वर्षाचा पंचायत समिती सेस निधी अद्याप पर्यत मिळालेला नाही. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गणातील सन्मानिय सदस्याना विकास कामे करता आले नाही.  तरी तो वेळेत मिळावा. सभापती यांना पंचायत समिती अधिनस्त सर्व विभागातील दहा बदल्या वर्ष भरात केव्हाही करण्याचा अधिकार मिळावा. पंचायत समितीस्तर 15 वा वित्त आयोग बंधित व अबधित प्राप्त झालेला असुन त्यास खर्चाची कठीण प्रक्रीया शिथील करावी. पंचायत समिती येथील सर्व प्रतिनियुक्ती रद्द करावी. वरिष्ठ सहाय्यक राजेंद्र भगवान खाचणे  यांची जिल्हा परिषदेत प्रतिनियुक्तीवर झालेली बदली करावी. ही प्रतिनियुक्तीवरील बदल रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान,  पंचायतीराज समिती अध्यक्ष  संजय रायमुलकर यानाचा पुष्पगुच्छ देवून सभापती ललिता पाटील यांनी स्वागत केले. याप्रसंगी  आ. किशोर पाटील, आ. राजूमामा भोळे, जनार्दन पाटील आदी उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/392263092511470

 

Protected Content