शिक्षकांना दुसऱ्या राज्यातून विद्यार्थी आणण्यासाठी दबाव ; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

raver news 6

रावेर, प्रतिनिधी | तालुक्यातील काही आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांची कागदपत्रे व रहिवासाची पडताळणी केल्यास अनेक धक्कादायक बाब समोर येत आहे. यात अनेक ठिकाणीची मुले ही महाराष्ट्रीयन असून आश्रमशाळेत शिक्षण घेतात तर आई-वडील मध्यप्रदेशवासी आहे. यामुळे रावेर तालुक्यातील आदिवासी बांधवांची मुले वंचित राहत आहे. याबाबीकडे प्रकल्पधिकारी विनीता सोनवणे यांनी दुर्लक्ष असून या सर्व प्रकरणाची एका समिती मार्फत चौकशी करण्याची मागणी होत आहे.

रावेर तालुक्याती काही आश्रमशाळांमध्ये मुले महाराष्ट्रीयन दाखवतात तर आई-वडील हे मध्य प्रदेशचे रहिवासी असतात. याची सखोल चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल असे आश्रमशाळेत शिक्षण देणाऱ्या एका शिक्षकाने सांगितले. मला वारंवार मुले घेण्यासाठी मुख्यध्यापक मध्यप्रदेशयात पाठवतो. या गोष्टीचा खुप कंटाळा आला असून मी येत्या मे महिन्यात सेवानिवृत्ती घेऊन या जाचातुन मुक्त होणार असल्याचे त्या शिक्षकाने आमच्या प्रतिनिधिला सांगितले. ते पुढे म्हणाले की, विद्यार्थी मध्यप्रदेशातील असून त्यांना बनावट कागदपत्रे तयार करून आधारकार्ड काढून महाराष्ट्राच्या कोणत्याही खेड्यावरील रहिवासी दाखवून प्रवेश दिला जातो. परंतु, मुळात त्यांचा परीवार संबधित गावात राहत नाही. ते मुळचेच मध्य प्रदेशचे असून तेथेच रहिवासी करत असतात. आता हे काम माझ्याकडून होणार नाही असे देखिल त्याने मुख्यध्यापकाला सांगितले आहे. त्यामुळे आश्रमशाळांची स्थिती किती विदारक झाली आहे हे या शिक्षकांच्या माहिती वरुन समजते. त्यामुळे सर्व आश्रमशाळांचे ऑडीत करण्याची मागणी होत आहे.

आश्रमशाळेच्या मयत मुलांच्या कुटुंबाला तहसिलदार उषाराणी देवगुणेंची भेट  : आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या मयत आकाश बारेला व राकेश बारेला यांच्या कुटुंबाला भेट देऊन कुटुंबाचे सात्वंत केले व प्रशासनाकडून आवश्यक ती मदत करण्याचे सांगितले. काही दिवसा पूर्वी लालमाती आश्रमशाळेत इयत्ता पहिलीत शिक्षण घेणा-या दोन सख्या भावांचा त्यांच्या राहत्या घरी मृत्यू झाल्या नंतर तालुक्यातील आश्रमशाळां मधील सोयी-सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Protected Content