बोरगाव येथे दोन गावांंचा ‘एक दुर्गा उत्सव’ उपक्रम ; १९ वर्षाची परंपरा

navratr

बोरगाव, प्रतिनिधी | धरणगाव तालुक्यातील बोरगाव बु व बोरगाव खु हि दोन गावे मिळुन गेल्या १९ वर्षा पासुन “दोन गावे एक दुर्गा उत्सव साजरा करण्यात येतो या निमित्ताने विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले असतात.

या दुर्गा उत्सवानिमित्त आज रविवार दि. २९ रोजी ह.भ. प.चंद्रकांत महाराज आर्थेकर, सोमवार दि. ३० रोजी विश्वनाथ महाराज वाडेकर यांचे कीर्तन होणार आहे. तर मंगळवार दि. १ ऑक्टोबर रोजी जनार्दन महाराज आरावेकर ,दि २ रोजी शुभम महाराज मंदानेकर, दि. ३ रोजी पथनाट्य, दि ४ रोजी गोपाळ महाराज सासोरीकर, दि. ५ रोजी दांडिया, दि. ६ रोजी गोविंद महाराज वरसाडे(पाचोरेकर), दि. ७ रोजी धन्य ज्ञानेश्वर महाराज कंदानेकर, दि. ८ रोजी दसरा, दांडिया दि.१० रोजी दोघे गाव मिळून भंडारा करण्यात येणार आहे. यात सरपंच बोरगाव बुद्रुक ,खुर्द ,सर्व अबाल वृद्ध ,तरुण ,व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.

Protected Content