गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात जागतिक योग दिनानिमित वेबिनार

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचालित गोदावरी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयात आज जागतिक योग दिनानिमित्त ‘Yoga for Holistic Health’ या विषयावर वेबीनाराचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयाचे संचालक डॉ.प्रशांत वारके यांनी यावेळी सांगितले की, योगा हा मानवतेसाठी एक वरदान आहे. नियमित योगाभ्यास केल्यामुळे शरीर लवचिक बनते, रक्तभिसरण, पचनशक्ती, एकाग्रता इ. सुधारते. बऱ्याच आजारांपासूनसुध्दा बचाव करता येतो.

सदर वेबीनार मध्ये जळगाव शहरामधील योग प्रशिक्षक ललिता झवर यांनी वेगवेगळ्या प्रकारचे योग शिकविले व प्रत्येक योगा विषयी माहिती दिली व त्याचे फायदे  सांगितले. योगा केल्याने शरीरावर एक सकारात्मक परिणाम होतो. मानसिक ताण कमी ठेवण्यास मदत होते व मन शांत राहते असे त्यांनी उपस्थितांना सांगितले. या वेबीनारला महाविद्यालयाच्या BBA, BCA, MBA चे विद्यार्थी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रा.श्रुतिका नेवे यांनी केले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व कामकाज महाविद्यालयाचे प्रा. प्रिया फालक यांनी केले.

यावेळी महाविद्यालयाचे डॉ. नीलिमा वारके, प्रा. मकरंद गोडबोले, प्रा. प्राजक्ता पाटील, प्रा. चेतन सरोदे, डॉ. अनुभूती शिंदे, प्रा. भाग्यश्री पाटील, प्रा. आफ्रिन खान, प्रा. अश्विनी सोनवणे, प्रा. श्रुतिका नेवे, प्रा. मिताली शिंदे, प्रा. प्रिया फालक, प्रा. चंद्रकांत डोंगरे, प्रा. दिपक दांडगे, मयुर पाटील, गौरव पाटील, सागर चौधरी, गणेश सरोदे, प्रशांत किरंगे, जीवन पाटील, प्रफुल्ल भोळे, रुपेश पाटील, घनश्याम पाटील, रुपेश तायडे, जयश्री चौधरी, भावना ठाकूर इ. कर्मचारी उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!