गोपी गोल्ड इंग्लिश मिडीयम स्कूल येथे जागतिक मराठी दिवस साजरा

एरंडोल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | ग्रामीण उन्नती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक मराठी दिवस साजरा करण्यात आला.

जागतिक मराठी दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाची सुरुवात हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे ,या प्रार्थनेचे करण्यात आले, तसेच इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. सर्व विद्यार्थ्यांनी मराठमोळी वेशभूषा परिधान करून अतिशय सुंदर असे विविध कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. मराठी च्या पाठ्यपुस्तकावर आधारित इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी कविता तालासुरात सादर केले. दीप्ती पाटील, स्वरा पगार, स्नेहल महाजन, केवल वालडे यांनी राजभाषा दिवस याबद्दल अतिशय सुंदर अशी माहिती सांगितली . तसेच स्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योती वडगावकर यांनी प्रास्ताविक करून राजभाषा मराठी दिवसाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच वि. वा. शिरवाडकर ( कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साहित्य संपदेविषयी माहिती दिली. माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अंजुषा विसपुते व संस्थेचे अध्यक्ष सचिन विसपुते यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून मराठी राजभाषाविषयी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे नियोजन आशा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन रूपाली तेलंगे यांनी केले. यशस्वीतेसाठी गोपी गोल्ड स्कूलच्या सहशिक्षिका हिना सय्यद, कविता सुर्वे, सुवर्णा बाळापुरे, अश्विनी महाजन , गौरी सोनार, ममता सुतार, नयना बडगुजर यांचे सहकार्य लाभले.

Protected Content