मनवेल येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मनवेल येथील अंगणवाडी कार्यालयात आज सकाळी पल्स पोलिओ लसीकरण मोहीमचा  शुभारंभ मनवेल ग्रामपंचायतीचे सदस्यं मंगलसिंग धनसिंग पाटील यांच्या हस्ते यश रविद्र ईधांटे या बालकांला पल्स पोलिओची लस पाजून करण्यांत आले.

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी   आशा स्वयंमसेविका रंजना कोळी, पुनम पाटील, अंगणवाडी मदतनीस आलकाबाई ईंधाटे, ज्योती ईंधाटे , ग्रामपंचायत सदस्यं मंगलसिंग पाटील , ग्रामपंचायत सदस्यं सुंनदाबाई सुधाकर पाटील, कर्मचारी गणेश पाटील, पत्रकार गोकुळ कोळी , राहुल पाटील, बुद्धभुषण इंधाटे सह ग्रामथ उपस्थीत होते. यावल तालुका वैद्यकीय अधिकारी मनिषा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली साकळी प्राथमिक आरोग्य केन्दाचे डॉ. स्वाती कवडीवाले, समुदाय आरोग्य आधिकारी डॉ. अस्मा प्रविण नमुउद्दीन शेख, आरोग्यसेवक राजेश्वर निकुंभ, आरोग्य ,वाहन चालक शेख सोयब, यांनी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी कामकाज पहिले.

Protected Content