राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांचा उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे जाहिर निषेध

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | महाराष्ट्रासह अखंड हिंदुस्थानचे आदर्श तथा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचेसह सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करत शहरातील “शिवतीर्थ” या शिवसेना कार्यालयापासुन छत्रपती शिवाजी चौकापर्यंत निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

तसेच भगतसिंग कोशारी व सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला चपला मारत जाहिर निषेध करण्यात आला.

याप्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंह सुर्यवंशी, जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपुत, उपजिल्हाप्रमुख अॅड. दिपक पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख अॅड. दिपक पाटील, अनिल सावंत, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख संदिप जैन, नगरसेवक दत्ता जडे, दादाभाऊ चौधरी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील, भरत खंडेलवाल, अभिषेक खंडेलवाल, हरिष देवरे, अजय पाटील, भुपेश सोमवंशी, राजेंद्र राणा, अधिकार पाटील, जगदिश महाजन, आवेश खाटिक, गणेश बडगुजर, अनिस शेख, बंडु मोरे, अमरसिंग पाटील, हर्षल पाटील, विलास पाटील, मंदाकिनी पारोचे, प्रशांत पाटील, अन्वर शेख हमिद यांचे सह मोठ्या संख्येने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्राची व मराठी माणसाची अस्मिता व आदर्श असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल खोटे व चुकीचे वक्तव्य करणारे राज्याचे राज्यपाल तथा भाजपाच्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भगतसिंग कोशारी व भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदींचा जाहिर निषेध नोंदवत या दोन्ही शिवद्रोही विकृत व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन देखील उपस्थिंतातर्फे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना देण्यात आले आहे.

Protected Content