शेंदुर्णी येथे राज्यपाल कोशारी व सुधांशु त्रिवेदी यांच्या प्रतिमांना जोडे मारो आंदोलन

शेंदुर्णी ता.जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी नागरिकांकडून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी निषेध करून त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्याच्या जनतेचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना बडतर्फ करण्याची व सुधांशु त्रिवेदी यांच्यावर भाजपने कारवाई करण्यासाठीं जिल्हा पोलिस अधीक्षक जळगांव यांच्या नावे निवेदन देण्यात आले असून निवेदाद्वारे वरील मागणी करण्यात आली आहे.

आज दि. २१ येथील गरूड पतसंस्था जवळून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय दादा गरूड, सागरमल जैन, शांताराम गुजर यांच्या नेतृत्वखाली निघालेल्या मोर्चात राज्यपाल कोशारी हटाव महाराष्ट्र बचाव, राज्यपालांच करायचं काय खाली डोके वर पाय, सुधांशू त्रिवेदी हाय हाय, छत्रपतीं शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या पहूर दर्जा येथे राज्यपाल भगतसिंग कोशारी व सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमांना जोडे मारून प्रतिमा दहन करण्यात आल्या यावेळी माजी जि.प.सदस्य संजय गरूड , सागरमल जैन यांची भाषणे झाली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक दिलिप पाटील यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनातील भावना
महामहिम राष्ट्रपती, भारत सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्या पर्यन्त पोहोचवावी ही विनंती करण्यात आली आहे. आंदोलनात रघुनाथ माळी, स्नेहदिप गरूड,नंदकिशोर बारी, प्रविण पाटील, शंतनु गरूड, शंकर इंदरकर, प्रविण गरूड, विलास अहिरे, संजय चिंचोले, मनोज पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, मंगल बिल्होरे गुरुजी, महेश भदाने, मनोज पाटील, प्रदीप धनगर, करुण राजे सुर्वे, श्रीराम काटे, विजय चौधरी, सावजी वानखेडे, कैलास पाटील, धनराज नाथ, गिरीष शिंदे, सुनील शिंपी, अरुण माळी, सुरेश बगळे, विनय गरूड, जगन गुजर, संदीप काबरा व अन्य नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content