केंद्रीय मंत्री राणे यांची उच्च न्यायालयात धाव,

 मुंबई लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बंगल्याचे अनधिकृत बांधकाम केले असल्याचे स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने दिले होते. ते अनधिकृत बांधकाम झाल्याचं स्पष्ट करीत अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी नोटीस पाठवली होती. अनधिकृत बांधकाम प्रकरणी नोटीस कालावधी संपुष्टात आल्याने केंद्रीय मंत्री राणे यांची उच्च न्यायालयात धाव घेतली असून यावर मंगळवारी २२ मार्च रोजी तातडीने होणार सुनावणी घेण्यात येणार आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जुहू येथील ‘अधीश’या बंगल्यात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने नारायण राणे यांना नोटीस दिली होती. दिलेल्या मुदतीत जर हे बांधकाम हटवलं गेलं नाही तर पालिकेकडून यावर कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेने म्हटले होते. त्यानुसार आज खंडपीठासमोर ही याचिका सादर करण्यात आली होती, आता या नोटीशीचा कालावधी संपुष्टात येत असून महापालिकेने त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले असून, उच्च न्यायालयाकडून उद्या मंगळवारी तातडीने सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे यावर न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.
सीआरझेड नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जुहू तारारोड येथील बंगल्यात अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार होती. या बंगल्याच्या बांधकामामुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन तक्रारीच्या आधारे तपासणी करीत बंगल्यातील अनधिकृत बांधकाम १५ दिवसांत हटवण्याचे आदेश मुंबई महानगरपालिके कडून सांगण्यात आले आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Protected Content