राज्यात जिल्ह्यांच्या वर्गवारीप्रमाणे निर्बंधांची शिथिलता

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यात कोरोना परिस्थितीनुसार पाच गटांत जिल्ह्यांची वर्गवारी असून, त्यानुसार निर्बंध शिथिल केले जाणार आहेत . ७ जूनपासून अनलॉक करण्यात येणार आहे. 

या आदेशानुसार अनलॉकसाठी पॉझिटिव्ही रेट आणि उपलब्ध ऑक्सिजन बेडची स्थिती यावरून ‘अनलॉक’चे पाच गट तयार करण्यात आले आहेत.

पहिला गट – ज्या जिल्ह्यांमध्ये करोना पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि ऑक्सिजन बेड २५ टक्केपेक्षा कमी भरलेले आहेत. त्यांचा पहिल्या गटात समावेश केला जाणार आहे.

दुसरा गट – पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्स भरले आहेत अशा जिल्ह्यांचा समावेश या गटात केला जाणार आहे.

तिसरा गट – पॉझिटिव्हिटी दर हा ५ ते १० टक्के किंवा ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड व्यापलेले आहेत असे जिल्हे तिसऱ्या गटात असणार आहेत.

चौथा गट – पॉझिटिव्हिटी दर हा १० ते २० टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड्स ६० टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत असे जिल्हे चौथ्या गटात असणार आहेत.

पाचवा गट – पॉझिटिव्हिटी दर हा २० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स व्यापलेले आहेत असे जिल्हे या गटात समाविष्ट केले जाणार आहेत.

पहिल्या गटातील जिल्हे – अहमदनगर, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, ठाणे, वर्धा.

दुसऱ्या गटातील जिल्हे – औरंगाबाद, गडचिरोली, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी.

तिसऱ्या गटातील जिल्हे – अकोला, अमरावती, बीड, वाशिम, यवतमाळ.

चौथ्या गटातील जिल्हे – पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर.

 सरकारने परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक जिल्हा प्रशासनाला/आपत्ती व्यवस्थापन समितीला दिलेले आहेत.

 

Protected Content