पीककर्ज वाटपात शेतकऱ्यांची अडवणूक खपवून घेतली जाणार नाही – आ. श्वेताताई महाले

चिखली, बुलढाणा । पीककर्ज वाटपात शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक खपवून घेतली जाणार नाही, बैठकीत उपस्थित वरीष्ठ अधिकाऱ्यांनीही पीककर्ज सुलभ पद्धतीने वाटप करण्याबाबत संबंधीतांना सुचना दिल्या.

मागील वर्षीप्रमाणे यावर्षी पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आज पंचायत समिती, चिखली येथे खरीप पीक कर्ज २०२१ आढावा बैठक घेण्यात आली. सद्यस्थितीत शेतकरी हवालदिल झालेले आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या माध्यामातून आधार देणे आवश्यक आहे. ते तात्काळ वाटप करण्यात यावे. अनावश्यक कागदपत्रांची मागणी करु नये, शेतकऱ्यांना बँकेच्या दारात ताटकळत उभे ठेऊ नये. पीककर्ज वाटपात शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. बैठकीत उपस्थित वरीष्ठ अधिकाऱ्यांनीही पीककर्ज सुलभ पद्धतीने वाटप करण्याबाबत संबंधीतांना सुचना दिल्या. बैठकीतील सुचनांवर अंमलबजावणी झाल्यास शेतकऱ्यांना सहज पीक कर्ज ऊपलब्ध होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. पीककर्जांव्यतिरिक्त बचत गटांच्या महिलांचे खाते तातडीने उघडण्यात यावेत, जे बचत गट कर्ज मिळवण्यासाठी पात्र आहेत त्यांना अनावश्यक कागदपत्रांची मागणी न करता त्यांना प्राधान्याने कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत असंघटित व अनोंदणीकृत अन्न प्रक्रिया उद्योगांकरिता पंतप्रधान सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना सन २०२०-२१ ही केंद्र पुरस्कृत योजना सन २०२०-२१ ते २०२४-२५ या ५ वर्षांसाठी देशभरामध्ये राबविण्याचे नियोजन केले आहे. ही योजना एक जिल्हा एक उत्पादन, या धर्तीवर राबविली जाणार आहे. या योजनेअंतर्गत प्रकिया अन्न उद्योगाकरिता सामाईक पायाभूत सुविधा केंद्राकरिता ३५ टक्के अनुदान, ब्रॅंडिंग व मार्केटिंगसाठी एकूण खर्चाच्या ५० टक्के अनुदान स्वयंसहाय्यता गटांना बीज भांडवल लहान उपकरणे खरेदीसाठी ४० हजार प्रती सभासद (४ लाख) पर्यंत अनुदान देय राहील. योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता गट आणि सहकारी उत्पादक, शासन यंत्रणा किंवा खासगी उद्योग इत्यादी घटकांना लाभ देण्यासाठी सामाईक पायाभूत सुविधा या घटकांतर्गत नवीन प्रकल्पाचे प्रस्ताव ओडीओपी उत्पादनावर देता येतील. तसेच सद्य:स्थितीत अस्तित्वात असलेल्या प्रक्रिया प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी एक जिल्हा एक उत्पादनाच्या व्यतिरिक्त इतर प्रस्ताव देखील या योजनेमध्ये सादर करता येणार असून पंतप्रधान सुक्षम खाद्य उद्योग योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक ते सहकार्य करावे, अशीही सूचना यावेळी संबंधितांना दिली.

यावेळी पंचायत समिती सदस्य सिंधुताई तायडे, पंचायत समिती सदस्या मनिषाताई सपकाळ, तहसीलदार डॉ अजितकुमार येळे, श्री हेडाऊ, गटविकास अधिकारी हिवाळे साहेब, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे , विस्तार अधिकारी जीवन फुलझाडे, विस्तार अधिकारी वाघ, गजानन पोफळे, पंजाबराव धनवे पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संतोष काळे पाटील, विनोद सिताफळे, तालुका सरचिटणीस, किशोर जामदार, राम देशमुख, दीपक झाडे यांच्यासह सर्व बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.