विद्यापीठात प्रकाश शुक्ल यांचे व्याख्यान

जळगाव प्रतिनिधी । येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळेतर्फे संशोधन सिध्दांत व प्रक्रिया या विषयावर प्रा. प्रकाश शुक्ल यांच्या व्याख्यानाचे आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशाळेचे संचालक प्रा. म.सु.पगारे अध्यक्षस्थानी होते. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. शुक्ल म्हणाले, भाषा आणि सामाजिकशास्त्रे या विषयांची संशोधन पद्धती ही विज्ञान आणि वाणिज्य या विद्या शाखेतील विषयांच्या संशोधन पद्धतीपेक्षा वेगळी असते. तसेच संशोधनाचेदेखील एक स्वंतत्र असे मनोविज्ञान असते. जागतिकीकरणाच्या प्रवाहात ज्या प्रमाणे इतर गोष्टीत मोठ्या प्रमाणात बदल घडून आले, त्याचप्रमाणे भाषा संशोधनाचे स्वरुपदेखील फार मोठ्या प्रमाणात बदलले आपणास दिसून येते. त्यामुळे जागतिकीकरणाची प्रक्रिया समजून घेतल्याशिवाय विद्यार्थी संशोधकाला संशोधन प्रक्रिया समजून घेता येणार नाही. हे करत असताना संशोधकाने जागतिकीकरणाचे काही दुष्परिणामदेखील लक्षात घेणे गरजेचे आहे, असा सल्लाही या वेळी प्रा. शुक्ल यांनी विद्यार्थ्यांना दिला. डॉ.प्रीती सोनी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. विभागप्रमुख डॉ. सुनील कुलकर्णी यांनी आभार मानले.

Protected Content