Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज एक बाधित रूग्ण आढळला; ११ रूग्ण झाले बरे...

कोरोना : जिल्ह्यात आज एक बाधित रूग्ण आढळला; ११ रूग्ण झाले बरे !

0
114


जळगाव –  लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आजही एक कारोनाबाधित रूग्ण आढळला आहे. तर ११ कोरोनाबाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 

आजच्या अहवालात भुसावळ शहरातून एक बाधित रूग्ण आढळून आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ५१ हजार ५०७ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४८ हजार ८६४  रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. कोरोना बाधितांपैकी आजपर्यंत २ हजार ५९१ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ५२ कोरोना बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 


Protected Content

Play sound