रतनलाल सी. बाफना ज्वेलसला युबीएम पुरस्कार

जळगाव प्रतिनिधी । युबीएम इंडियातर्फे देण्यात येणारा पुरस्कार रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सला प्रदान करण्यात आला.

नवी दिल्ली येथील एका शानदार कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशातील २४ पेक्षा अधिक शहरांमध्ये अग्रगण्य मार्केट रिसर्च एजन्सीद्वारे केलेल्या स्वतंत्र ग्राहक सर्वेक्षणावर आधारित या पुरस्काराची निवड करण्यात आली आहे. रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सने त्यांच्या गुणवत्ता प्रदान करण्याच्या सातत्यपूर्ण रेकॉर्डसह ग्राहकांना परवडतील, असे दागिने व सुरक्षितता देण्याच्या बाबतीत सातत्याने विक्रम नोंदवला आहे. कित्येक वर्षांत ग्राहक केंद्रीत ब्रँड म्हणून अनुकरणीय कामगिरी केल्याबद्दल या पुरस्काराने त्यांचा सन्मान केला. शिवाय महाराष्ट्रातील काही शहरातील हा एकमेव ब्रँड आहे, ज्याला ही पदवी देऊन गौरवले आहे.

Protected Content