शिक्षणशास्त्र महाविद्यालयात भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । के.सी.ई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत महान क्रांतिकारी जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली.

महाविद्यालयातील विद्यार्थी सौरभ पाठक यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यसैनिक रॉबिन हूड तंट्या भिल यांचे जीवन चरित्र, स्वातंत्र्य लढ्यातील योगदान याबद्दल उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक यांना माहिती दिली. तसेच महाविद्यालयातील प्रा. किसन पावरा सर यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवन चरित्राबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात श्रीमती प्रा. डॉ.शैलजा भंगाळे यांनी बिरसा मुंडा या आदिवासी विराचा संक्षिप्त जीवन परिचय व त्यांचे भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील योगदान बद्दल थोडक्यात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. पंकज पाटील यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.

Protected Content