संत बाबू महाराज राहितकर यांचे अपघाती निधन

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील गाते येथील भक्तीधाम जनजागृती सेवाश्रमचे प्रमुख संत बाबू महाराज राहितकर यांचे डंपर चालकाने अचानक रिव्हर्स घेतल्याने झालेल्या अपघातात निधन झाले.

या संदर्भातील माहिती अशी की, रावेर तालुक्यातील गाते येथे भक्तीधान जनजागृती सेवाश्रम असून याचे प्रमुख संत बाबू महाराज राहितकर होते. ते आपल्या मातोश्रीसह या आश्रमाच्या परिसरातील गजानन महाराज मंदिरात वास्तव्याला होते.

आज सकाळी एक डंपर परिसरात आले. याच्या चालकाला मागे कुणी उभे असल्याची जाणीव झाली नाही. यामुळे त्याने डंपर रिव्हर्स घेतली. यात बाबू महाराज राहितकर हे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना फैजपूर येथील खासगी रूग्णालयात दाखल केले असता त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांच्यासह इतरांनी रूग्णालयात धाव घेतली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content