अमळनेरात आजपासून व्याख्यानमालेचे आयोजन

अमळनेर प्रतिनिधी । येथील मराठी वाड्.मय मंडळ आणि अप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय यांच्या वतीने शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही व्याख्यानमाला २९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे दररोज सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. याच्या अंतर्गत २९ रोजी लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता, कादंबरीकार अशोक समेळ (मुंबई) यांचे मी एक चिरंजीवी अश्‍वत्थामा या विषयावर व्याख्यान होईल. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून साने गुरुजी क्रिटिकल केअर आणि स्पृहा प्रसूती गृहाचे डॉ. संदीप जोशी व डॉ. मयूरी जोशी यांची उपस्थिती राहिल. ३० रोजी सुप्रसिद्ध कथाकथनकार विभा काळे (ठाणे) यांचे कथा विविधा या विषयावर व्याख्यान होईल. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्‍वसन रोग तज्ज्ञ डॉ. स्वप्नील चौधरी यांची उपस्थिती राहिल. १ ऑक्टोबर रोजी कवी, अजिम नवाज राही (साखरखेडा, जि. बुलढाणा) यांचे माझ्या मराठी कवितेची जडणघडण या विषयावर व्याख्यान होईल. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सुमित सूर्यवंशी यांची उपस्थिती राहिल. २ ऑक्टोबरला पटकथाकार, अरविंद जगताप (ठाणे) यांचे गोष्ट छोटी डोंगरा एव्हढी या विषयावर व्याख्यान होईल. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष सुभाष भांडारकर व नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. अमित भंगाळे यांची प्रमुख उपस्थिती राहिल.
३ रोजी अखेरच्या दिवशी प्रसिद्ध संगीत नाट्य कलाकार व नाट्य परिषदेच्या माजी अध्यक्षा स्वर-किर्ती किर्ती शिलेदार, मुलाखतकार अश्‍विनी हिंगे (औरंगाबाद) यांची प्रकट मुलाखत होईल. या वेळी पाहुणे म्हणून युरोलॉजिस्ट डॉ. रवी महाजन व दिल्ली येथील रस्ते व परिवहन विभागाचे केंद्रीय सल्लागार शामकांत धर्माधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. रसिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content