अपक्ष आमदाराचा ‘अमळनेर पॅटर्न’ कायम राहणार की बदलणार?

9f4fce52 7e72 43ea a36d 871f4bb686e8

अमळनेर (प्रतिनिधी) मतदारसंघ इतर मतदार संघापेक्षा गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत जरा वेगळा ठरला आहे. या मतदार संघाचे राजकीय समीकरण नेहमी बदल राहिले आहे. या मतदार संघात सगळ दहा वर्षापासून अपक्ष आमदार निवडणू आले आहेत. त्यामुळे अपक्ष आमदाराचा ‘अमळनेर पॅटर्न’ यंदा  बदलणार की कायम राहणार? याचीच चर्चा जिल्हा भरात सुरु आहे. दरम्यान, गत निवडणुकीच्यावेळी अर्थकारणामुळे हा मतदार संघ चांगलाच गाजला होता.

 

सन 2009 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेले कृषीभूषण माजी आमदार साहेबराव पाटील (सध्या भाजपात ) हे निवडून आले होते. माजी आ.साहेबराव पाटील यांनी त्यावेळी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत राहून मोठी विकास कामे करून घेतली होती. त्यानंतर सन 2014 च्या निवडणुकीत नंदूरबारहून आलेले शिरीष चौधरी यांनी देखील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली. आमदार चौधरी यांनी सत्ताधारी भाजपाला समर्थन दिल्यानंतरही पाडळसरे धरण पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे आमदार शिरीष चौधरी आणि माजी आमदार साहेबराव पाटील यांच्यात निवडणुकीत कसोटी रंगणार असल्याचे चित्र आहे.

 

शिरीष चौधरी पक्षाचे की अपक्ष उमेदवार?

 

विदयामान आमदार शिरीष चौधरी हे भाजपाचे सहयोगी सदस्य असले तरी भाजप पक्षाकडून उमेदवारी मिळेल का? की पुन्हा अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील?, असे संभ्रम वातावरण आहे. आमदार चौधरींनी अमळनेर मतदार संघात विकास कामाचा धडाका लावला आहे.परंतु येणारी निवडणूक भाजप व राष्ट्रवादी यांच्यात लढत राहील हे निश्चित आहे. विद्यमान आमदार चौधरी हे विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी आ. चौधरींनी रेल्वे उड्डाणपूलसाठी रस्त्याकडील पाठपुरावा करून भरीव काम केले. तालुक्यातील ग्रामीण भागात व्यायामशाळा आणि ग्रामपंचायत कार्यालयाची उभारणी केली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य पुतळे उभारले. तालुक्यातील सर्व सामाजिक घटकांशी संबंध प्रस्थापित केले आहेत. हे असले तरी आमदार शिरीष चौधरी यांना पाडळसरे धरण पूर्ण करण्यात यश आले नाहीत, ही देखील वस्तुस्थिती आहे. आमदार चौधरी यांनी बोरी नदीवर उभारण्यात आलेले तीनही पुलांचे श्रेय घेतले. मात्र मुळात या कामांची मंजूरी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी आणली, अशी चर्चा आहे.

 

कृषिभूषण पाटलां विषयी सहानभुतीची लाट

 

माजी आमदार कृषिभूषण पाटलांनी शहरातील चौक सुशोभिकरण बोरी नदीवरील पूल रस्त्यांची कामे करून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. नगरपरिषदेमध्ये त्यांची सत्ता असल्याने त्यांनी शहर स्वच्छता, शौचालय, रस्ते याकडे विशेष लक्ष पुरवून अमळनेरकरांना आकर्षित केले आहे. शहरातल्या चौकाचौकात महापुरुषांच्या प्रतिमा लावून त्या-त्या चौकला महापुरुषांचे नामकरण केले आहे. त्यामुळे विविध सामाजिक घटक त्यांच्याकडे आकर्षिला जाताना दिसत आहे. कोणतेही काम असो त्या कामाचा निपटारा केल्याशिवाय ते राहत नाही, अशी साहेबराव पाटील यांची ख्याती आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांमध्ये एक सहानभूतची लाट आहे.

 

कायम बदलते राजकारण

 

अमळनेर मतदारसंघाचे राजकारण कायम बदलते राहीले. यापुर्वी अमळनेर मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला मानला जात होता. गुलाबराव पाटील यांच्यानंतर भाजपाकडुन डॉ. बी.एस.पाटील यांनी सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर अपक्ष म्हणून निवडून आलेले राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्य माजी आ. कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी बाजी मारली. आणि आता गेल्या विधानसभा निवडणुकीत सध्‍याचे आमदार चौधरींनी या मतदारसंघावर अर्थकारणामुळे अपक्ष म्हणून निवडून येत आमदारकी मिळविल्याने त्यांची अमळनेर मतदारसंघात ताकद वाढली.

 

“त्या’ हाणामारीचा भाजपला फटका बसण्याची भीती

अमळनेर मतदारसंघात 2 लाख 92 हजार 961 मतदार असुन त्यात 1 लाख 51 हजार 986 पुरूष तर 1 लाख 40 हजार 968 स्त्री आणि इतर 7 मतदार आहे. अमळनेर मतदार संघातून विधानपरिषदेसाठी आमदार स्मिताताई वाघ या प्रतिनिधीत्व करत आहे. जळगाव लोकसभेसाठी जाहीर झालेले तिकीट ऐनवेळी कापून उन्मेश पाटील यांना देण्यात आले. आणि लोकसभेच्या प्रचाराच्यावेळी आयोजित केलेल्या मेळाव्यात झालेल्या हाणामारीमुळे अमळनेर मतदारसंघातील राजकीय वातावरण गढूळ झाले. त्यामुळे अंतर्गत गटबाजी निर्माण झाली. याचा फटका भाजपाला येत्या विधानसभा निवडणुकीत बसणार असल्याची चर्चा आहे.

प्रमुख इच्छुक उमेदवार

 

यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपामध्ये अनेक इच्छुकांच्या या भाऊगर्दीमुळे भाजपाची या मतदारसंघात कसोटी लागणार आहे. सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी साहेबराव पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार स्मिता वाघ, पं.स. सदस्य भिकेश पाटील, माजी आ. डॉ. बी.एस.पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी हे इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादीकडुन जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील व संचालिका तिलोत्तमा पाटील आणि काँग्रेसकडुन अ‍ॅड. ललिता पाटील हे आहेत. सद्यस्थितीला भाजपा सहयोगी आमदार म्हणून शिरीष चौधरी आहे. माजी आमदार साहेबराव पाटील हे देखील भाजपात आहे. त्यामुळे कुणा एकाला उमेदवारी मिळणार आहे. परंतू येणाऱ्या काही दिवसातच सर्व पक्षांची भूमिका निश्चित होणार असून तिकीट मिळाल्यानंतर दोघे आजी व माजी आमदारांच्या मनात काय आहे हे येणारा काळच ठरवणार आहे.

Protected Content