Home Cities पाचोरा वरसाडे प्र. बो. ग्रामपंचायत बिनविरोध; आमदारांच्याहस्ते सत्कार

वरसाडे प्र. बो. ग्रामपंचायत बिनविरोध; आमदारांच्याहस्ते सत्कार


पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील वरसाडे प्र. बो. येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व सात जागांची बिनविरोध निवड झाली आहे. आमदार किशोर पाटील यांच्याहस्ते नवीन सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

वरसाडे ग्रामस्थ व ग्राम पातळीवरील सर्व स्थानिक जेष्ठ सामाजिक, व सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते यांच्या समन्वयातून गावाने नवा आदर्श स्थापित केला आहे. या निवडीबद्दल आमदार किशोर पाटील यांनी सर्व बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील, नितीन पाटील उपस्थित होते.

बिनविरोध निवड झालेले सदस्य खालीलप्रमाणे
जगन्नाथ पंढरीनाथ पाटील, संदीप धनसिंग पाटील, साधनाबाई विकास पाटील, रत्‍नाबाई रामकृष्ण पाटील, प्रमिला जगन्नाथ पाटील, यशोदा श्रीराम भिल, मायाबाई विनोद मोरे या सदस्यांच्या गळात विजयाची माळ पडणार असुन त्यांचे नियुक्तीबाबत ४ जानेवारी रोजी माघारीनंतर शिक्कामोर्तब होणार आहे. ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी प्रयत्न केले.


Protected Content

Play sound