रावेरात खान्देश माळी महासंघातर्फे सावित्री लेकींचा गौरव

रावेर प्रतिनिधी । खान्देश माळी महासंघाच्या येथील शाखेतर्फे तालुक्यातील विवीध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पाच महिलांना सावित्रीच्या लेकींचा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम सावित्रीबाई फुले नगरमध्ये संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी माळी महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्ष शकुंतला महाजन, रेखा जोशी, पद्माकर महाजन कांतीलाल महाजन , इ. जे.महाजन, डी. डी. वाणी प्रवीण पाटील उपस्थित होते. यावेळी प्रतिभा बोरोले(खिरोदा), जयश्री कुलकर्णी(रावेर), मधुमती महाजन(वाघोड), वर्षा पाटील)(केऱ्हाळा), उज्वला मांडवकर (अजंदा)या सावित्रीच्या लेकींना शाल, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन सावित्रीच्या लेकी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कारार्थी प्रतिभा बोरोले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खान्देश माळी महासंघाचे रावेर तालुकाध्यक्ष पिंटू महाजन यांनी केले.

Protected Content