Home प्रशासन रावेर तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का ; मोहगण-आहीरवाडी परिसरात खळबळ, ३.३ रिश्टर स्केलची...

रावेर तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का ; मोहगण-आहीरवाडी परिसरात खळबळ, ३.३ रिश्टर स्केलची नोंद

0
19


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील मोहगण-आहीरवाडी परिसरात आज सकाळी सुमारे ७ वाजून ५७ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. अचानक जाणवलेल्या धक्क्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू गंगापुरी धरणाजवळ जमिनीखाली असल्याचे सांगण्यात येत आहे. धक्का सौम्य स्वरूपाचा असल्याने आतापर्यंत कोणतीही मोठी जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. सकाळच्या वेळेस अचानक जमिनीला हादरा जाणवल्याने मोहगण, आहीरवाडी आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. काही वेळातच भूकंपाची माहिती परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये याबाबत चर्चा सुरू झाली.

रावेरचे तहसीलदार संजय तायडे यांनी भूकंप झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भूकंपाची तीव्रता कमी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाले आहे का, याचीही माहिती प्रशासनाकडून घेतली जात आहे.


Protected Content

Play sound