नवनीत राणा यांचे चांदीची गदा भेट करून स्वागत (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील महाराणा प्रताप मंडळाच्या ठिकाणी श्री गणेशाची आरती व हनुमान चालीसा पठण करण्यासाठी आलेल्या खासदार नवनीत राणा यांचे आज सोनवणे परिवाराच्या वतीने चांदीची गदा भेट देऊन स्वागत करण्यात आले.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याचे आज रात्री सव्वाआठच्या सुमारास जळगावात आगमन झाले. त्यांचे कैलास सोनवणे आणि त्यांच्या कुटुंबाच्या वतीने अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. जय श्रीराम आणि बजरंग बली की जयच्या जयघोषात ढोल-ताशांच्या गजर, फुलाच्या पाकळ्यांचा वर्षाव आणि फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत झाले.

यानंतर राणा दाम्पत्याच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. नंतर महाराणा प्रताप मंडळ आणि कैलास सोनवणे कुटुंबाच्या वतीने राणा दाम्पत्याचे स्वागत करण्यात आले. यात नवनीत राणा यांना चांदीची गदा भेट करून जंगी स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी,  जामनेरच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन, माजी महापौर सीमाताई भोळे, माजी महापौर भारती सोनवणे, ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह मान्यवरांसह उपस्थिती होती.
महाराणा प्रताप मित्र मंडळा
तर्फे नवनीत राणा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष कल्पेश कैलास सोनवणे, माजी अध्यक्ष सुरेश सोनवणे, सचिव बाळू नांद्रे, दिलीप  शिकवाल, नितीन शर्मा, संदीप मंडोरा, सोमनाथ व्यास, प्रदीप भावसार, आबा टेलर, किशोर मंडोरा, दिनेश तिवारी यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Protected Content