१० हजार रुपयांच्या लाच मागणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीवरून शहानिशा करत खात्री झाल्यावर यशस्वी सापळा रचत शहरातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की,बिलामध्ये सॅक्शन असलेला लोड २६ केव्हीवरुन तो १८ केव्हीपर्यंतची दुरुस्ती करण्यासाठी महावितरणचे एमआयडीसी विभागातील अभियंता पाचंगे यांच्याकडून करुन देतो. असे सांगून दहा हजाराची मागणी करणार्‍या अनिल सुधाकर सासनीक (वय-३५, रा. प्लॉट नं.७, श्रद्धाकॉलनी महाबळ) याच्यावर लाचलूचपत प्रतिबंधकविभागाने कारवाई केली. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एमआयडीसी परिसरात तक्रादाराचा साई सर्व्हिसिंग नावाने कार रिपेअरींगचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे मीटर हे कमर्शियल असून त्यावर २६ केव्ही लोड सॅक्शन असे असतांना वीज बिलात लोड २ केव्ही असा नमूद  आहे. याठिकाणी एमईसीबी विभागाचे व्हिजीलन्सने तपासणी केली होती. तेव्हापासून तक्रादाराला वाढीव वीजबिल मिळत होते. तसेच बिलामध्ये सॅक्शन लोड २६ केव्ही ऐवजी तो १८ केव्ही करण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार खासगी पंटर अनिल सुधाकर सासनीक याने लोड दुरुस्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरला. तसेच तक्रादाराला दरमहा येणारे वीजबिलामध्ये वीजलोड दुरुस्त करुन महावितरणचे एमआयडीसी विभागाचे अभियंते श्री. पाचंगे यांच्याकडून काम करुन देतो यासाठी दहा हजारांची लाच मागितली होती. त्यानुसार तक्रारदाराने संबंधित पंटरची तक्रार लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. पथकाने सापळा रचून लाच मागणार्‍या अनिल सासनीक याला रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पथकाने केली कारवाई –

लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, एन.एन. जाधव, सङ्गौ दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोहेकॉ अशोक अहिरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, महिला पोलीस कर्मचारी शैला धनगर, जनार्दन चौधरी, सुनिल शिरसाठ, किशोर महाजन, सुनिल वानखेडे, बाळू मराठे, महेश सोमवंशी, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ, राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी, सचिन चाटे, प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने केली. या पथकाने हि कारवाई केली.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं नागरीकांना आवाहन –

‘कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव येथे संपर्क साधावा.’ असं लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं नागरीकांना आवाहन केलं आहे.

Protected Content