जागतिक आदिवासी दिनानिमित्त बिरसा मुंडा यांना अभिवादन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जागतीक आदिवासी दिनानिमित्त मंगळवार ९ ऑगस्ट रोजी बळीराम पेठेतील भारतीय जनता पार्टी कार्यालयात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून अभिवादन करण्यात आले.

सविस्तर माहिती अशी की, जागतिक आदिवासी दिनानिमित्त देशात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने शहरातील बळीराम पेठ येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते करण्यात येवून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्याला उजाळा दिला.

या कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, भाजपा महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, नगरसेविका सुचिता हाडा यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content