दोघांकडून दोन गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसे हस्तगत; पाळधी पोलीसात गुन्हा

धरणगाव प्रतिनिधी । एरंडोल  तालुक्यातील सावदे या शिवारात बेकायदेशीररित्या चार जण दोन  बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती पाधळी पोलिसांना मिळाली. पोलीसांनी कारवाई करत तीन जणांना अटक केली असून एक फरार झाला आहे. यातील अल्पवयीन मुलगा आहे.  याप्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, एरंडोल तालुक्यात चार जण बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूसे घेवून फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे यांना मिळाली. पाळधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांच्यासह त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार नसीम तडवी, विजय चौधरी, संजय महाजन, अरुण निकुंभ, गजानन महाजन, उमेश भालेराव, अमोल सूर्यवंशी, ज्ञानेश्वर बाविस्कर, किशोर चंदनकर, दत्तात्रय ठाकरे यांनी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ४.३० वाजेच्या सुमारास कारवाई करत एरंडोल तालुक्यातील सावदे येथून संशयित आरोपी सुनील बापू सोनवणे (वय-२५), दिलीप हिरामण सोनवणे (वय-२६) दोन्ही रा. सावदे ता. एरंडोल, १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा  यांना अटक केली. त्यांच्याकडून गावठी बनावटीचे दोन पिस्तूल व दोन जिवंत काडतूसे हस्तगत केली आहे.  चौथा संशयित आरोपी काल्या उर्फ भूषण तुकाराम मोरे रा. परधाडे  ता. पाचोरा हा फरार झाला आहे. या प्रकरणी पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून दोन मोटारसायकली हस्तगत केले आहेत.

Protected Content