पातोंडी येथील तरुणाची आत्महत्या

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील पातोंडी येथील एका ३४ वर्षीय युवकाने गळफास घेत  आपली जिवनयात्रा संपवली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.याबाबत रावेर पोलिसात अकास्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत वृत्त असे की, पातोंडी येथील रहिवासी विकास उर्फ बापु मधुकर ढाकणे (वय ३४) याने घरात कोणीही नसतांना दोरीच्या साहायाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजले नसून त्यांचे वडील मधुकर विठ्ठल ढाकणे यांच्या खबरी वरुन रावेर पोलिसात अकास्मत मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पॉ. कॉ. अर्जुन सोनवणे करीत आहे.

Protected Content