बसमध्ये चढतांना वृध्दाच्या खिश्यातून रोकड लांबविली

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बसमध्ये चढत असलेल्या वृध्दाच्या खिश्यातून रोकड लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

भिमराव सोनू बिऱ्हाडे वय ६८  रा.देवपुर धुळे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. कामानिमित्त ते ११ ऑक्टोबर रोजी अमळनेर शहरात आलेले होते. काम आटोपून दुपारी १ वाजता अमळनेर येथील बसस्थानकात आले. अमळनेर ते दोधवड (हिंगोण) बसमध्ये चढत असतांना संशयित महिला आरोपी संगिताबाई विष्णू लोढे रा. चाळीसगाव आणि इतर अनोळखी दोन महिलांनी भिमराव बिऱ्हाडे यांच्या शर्टाच्या खिश्यात मागून हात घालून ६०० रूपयांची रोकड लांबविल्याचे समोर आले. हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी महिलेला पकडले त्यात महिलेने नखाने त्यांना ओरबडले. व इतर दोन महिला फरार झाल्या. याप्रकरणी त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायंकाळी ५ वाजता संशयित आरोपी महिला संगिता लोढे हिच्यासह इतर दोन अनोखळी महिलांविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील करीत आहे.

 

Protected Content