धरणगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । स्थानिय सुवर्णमहोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव येथे आंतरराष्ट्रिय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम योग दिनाच्या प्रार्थनेने सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उत्तेजक व्यायाम प्रकार करण्यात आले. क्रिडा शिक्षक हेमंत माळी व एस.एन.कोळी यांनी स्वतः योगासने व प्राणायाम चे प्रात्यक्षिक केले. एस.एन. कोळी यांनी व्यायाम प्रकाराचे महत्त्व व फायदे मुलांना समजून सांगितले.

शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार, पर्यवेक्षक एम.बी.मोरे, पी.डी.पाटील, एस.व्ही.आढावे, सी.एम. भोळे, नूतन प्राथमिक चे मुख्याध्यापक अतुल सूर्यवंशी तसेच शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी वृंद व मुला – मुलींनी यांच्या पाठोपाठ योगासने करण्याचा आनंद घेतला. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा समारोप शांतीपाठाने करण्यात आला.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content