यावल व रावेर तालुक्यातील विकास कामांसाठी शनिवारी कार्यशाळा

फैजपूर प्रतिनिधी । यावल व रावेर तालुक्यातील गावांच्या विकास कामे, जलशक्ती अभियान आराखडा व कामाचे नियोजन संदर्भात शनिवार 10 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेस खासदार रक्षा खडसे, आ. एकनाथराव खडसे, आ. हरिभाऊ जावळे, आ. चंद्रकांत सोनवणे, जिल्ह्यातील यंत्रणा प्रमुख यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यशाळेमध्‍ये विविध यंत्रणांनी सुचवलेले गावांनी कामाचा आराखडा अवलोकनार्थ ठेवला जाणार आहे. प्रस्तुत आराखड्यात परिसंवाद चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील व तालुकास्तरीय सर्व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित राहणार आहे. तरी सदर बैठकीस यावल व रावेर तालुक्यातील प्रत्येक गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित व्यक्ती, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था गट प्रतिनिधी ,तसेच शक्ती अभियान तालुकास्तरीय समिती मध्ये समाविष्ट असलेले सर्व यंत्रणांचे प्रमुख, कृषी सहायक, ग्रामसेवक, पाणी विषयातील तज्ञ, जिल्हा परिषद सदस्य, व पंचायत समिती सदस्य, यांच्या समवेत सदर बैठक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी सदर कार्यक्रम शाळेत प्रत्येक गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवून जलशक्ती अभियान आराखडा व कामाचे नियोजन करण्यासाठी उपस्थित राहावे. यासाठी10 ऑगस्ट रोजी यावल येथे सकाळी 9 वाजता धनश्री चित्रमंदिर व रावेर येथे दुपारी 3 वाजता माजी सैनिक सभागृह रावेर येथे दोघे तालुक्यातील संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी या कार्यशाळेला जास्तीत जास्त संख्यने उपस्थित रहावे असे आवाहन प्रांतधिकारी डॉ अजित थोरबाले यांनी केले आहे.

Protected Content