हैदराबादच्या मशिदीत महिलांसाठी जीम!

हैदराबाद : वृत्तसंस्था । राजेंद्रनगर येथील एका मशिदीने जवळपासच्या परिसरांतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी व्यायामशाळा अर्थात जीम आणि ‘वेलनेस सेंटर’ सुरु केले आहे.

हैदराबादमध्ये पहिल्यांदाच असे घडले आहे की, एखाद्या मशिदीने तज्ज्ञ प्रशिक्षक असलेली, महिलांसाठीची व्यायामशाळा सुरु केली आहे. या झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांच्या आरोग्यासंबंधित समस्या आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव कमी करणे, हे या जीम आणि वेलनेस सेंटरचे उद्दिष्ट आहे

महिलांना शारीरिक व्यायामाकरिता दररोज दोन सत्रांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी व्यावसायिक महिला प्रशिक्षकाची नेमणूक केली गेली आहे. या सेंटरमध्ये आरोग्य सल्लागार आणि एक डॉक्टर देखील आहेत.

राजेंद्रनगरमधील वादी-ए-महमूद येथे असलेल्या मशिदी-ए-मुस्तफा येथील व्यायामशाळाला अमेरिकेतील ‘सीड ’ या अमेरिकेतील स्वयंसेवी संस्थेने अर्थसहाय्य दिले आहे. हेल्पिंग हँड फाउंडेशन ही शहरी स्वयंसेवी संस्था मशिद समितीशी समन्वय साधून हे वेलनेस सेंटर चालवत आहे.

या जीमतर्फे ओल्ड सिटीच्या झोपडपट्ट्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार असे दिसून आले आहे की, सुमारे ५२ टक्के महिलांना कार्डिओमॅटाबोलिक सिंड्रोमचा धोका आहे.

या सर्वेक्षणात, मुख्यत्वे २५ वर्षांपेक्षा जास्त वयांच्या स्त्रिया, ज्यांचा बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) असणार्‍या आणि इतर रोगांचा जास्त धोका असणार्‍या महिलांची या जीममध्ये प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. ‘मशिद क्लिनिक-कम-जीम’मधील एनसीडी प्रोग्रामचे मुख्य उद्दिष्ट आरोग्य मूल्यांकन, आहार, व्यायामाबद्दल सल्लामसलत आणि मुत्रपिंड, यकृत, डोळ्याच्या समस्येसाठी तपासणी हे असणार आहे. यासाठी इथे प्रशिक्षित आणि व्यावसायिक सल्लागार नेमण्यात आले आहेत, असे एचएचएफचे व्यवस्थापकीय विश्वस्त मुजताबा हसन अस्करी यांनी सांगितले

या सर्वेक्षणात असेही दिसून आले आहे की, इथल्या सुमारे ३० टक्के महिलांमध्ये पीसीओडीची समस्या आहे. एका सर्वेक्षणादरम्यान २५ ते ५५ वर्षे वयोगटातील महिलांचे परीक्षण केले गेले. यात सुमारे १ टक्के महिलांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आणि थायरॉईड समस्या होत्या. तसेच सर्व महिलांमध्ये बीएमआय २५ पेक्षा जास्त होता.

मुजतबा म्हणाल्या की, लठ्ठ महिलांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी सिंड्रोम होण्याचा धोका संभवतो. ज्याला आता इंसुलिन प्रतिरोध, टोलेरेंस आणि डी-एरेन्टेड लिपिड्स यासारख्या समस्यांमध्ये वर्गीकृत केले गेले आहे. या समस्यांमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका संभवतो.

Protected Content