Home Cities धरणगाव अपघातग्रस्त महिलेस प्रतापराव पाटलांची मदत !

अपघातग्रस्त महिलेस प्रतापराव पाटलांची मदत !

0
41

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अपघात झालेल्या महिलेस माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटलांनी तातडीने मदत करून रूग्णालयात दाखल केल्याची घटना घडली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील हे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमासाठी सोमवारी संध्याकाळी धरणगाव येथे जात होते. याप्रसंगी त्यांना एक महिला रस्त्याच्या कडेला विव्हळत असलेली दिसली. त्यांनी तातडीने आपले वाहन थांबवून त्या महिलेस रूग्णालयात रवाना केले.

मोटारसायकल घसरल्याने या महिलेचा अपघात झाला असून जखमी अवस्थेत ती होती. याप्रसंगी प्रतापराव पाटील यांनी तात्काळ या महिलेस स्वत: ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. वेळीच उपचार मिळाल्याने त्या महिलेचे प्राण वाचले. यामुळे सदर महिलेच्या आप्तांनी प्रतापभाऊंचे आभार मानले आहेत.


Protected Content

Play sound