शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे जिल्हा बास्केटबॉल स्पर्धेत वर्चस्व

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिंदे इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथील १४ वर्षा आतील मुले व १७ वर्ष आतील मुली यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जिल्हा बास्केटबॉल स्पर्धेत वर्चस्व प्रस्थापित केले.

 

जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय व जळगाव हौशी बास्केटबॉल असोशिएशन आयोजित उर्वरित जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन नुकतेच जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत पाचोरा येथील गिरणाईक शिक्षण संस्था संचलित शिंदे इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने विजय पताका फडकवली. या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी जिल्हयातून विविध तालुक्यातील संघ सहभागी झाले होते. गिरणाई शिक्षण संस्था संचालित शिंदे इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथील १४ वर्षा आतील मुले व १७ वर्ष आतील मुली यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सर्व तालुक्यांविरुद्ध एकतर्फी विजय संपादन करत विभागीय स्पर्धेत आपला विजय निश्चित केला. विजेत्या खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष पंडित शिंदे, उपाध्यक्ष निरज मुनोत, सचिव अॅड. जे. डी. काटकर, सहसचिव शिवाजी शिंदे, भाजपा युवा नेते अमोल शिंदे, शाळेचे प्राचार्य डॉ. विजय पाटील यांचेसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे. सर्व विजयी खेळाडूंचे गिरणाई  शिक्षण संस्थेच्या वतीने मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सदर विद्यार्थ्यांना शालेय क्रीडा बास्केटबॉल प्रशिक्षक जावेद सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.  विजयी खेळाडूंचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

 

Protected Content