राष्ट्रीय आदिवासी कोळी समाजाचा वधू-वर मेळावा ; २७९ युवक युवतींंनी दिला परिचय (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 12 29 at 7.09.52 PM

जळगाव, प्रतिनिधी | श्री माता मनुदेवी बहुउद्देशीय संस्था संचलित राष्ट्रीय आदिवासी कोळी समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळाव्यात २७९ विवाह इच्छूक उमेदवारांनी आपला परिचय करुन दिला. सरदार वल्लभभाई पटेल हॉलमध्ये आयोजित १० वा राष्ट्रीय आदिवासी कोळी समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे उद्घाटन आ. रमेश पाटील यांच्या व आ. लता चंद्राकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

मा. आ. चद्रकांत सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप साळुंखे, नगरसेवक कैलास सोनवणे, पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे, प्रथम लोकनियुक्त सरपंच सरस्वती सोनवणे, जि.प.सदस्य पवन भिलाभाऊ सोनवणे, श्री माता मनुदेवी बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष मुकेश सोनवणे याचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोळी महारंघाचे अध्यक्ष आ.रमेश पाटील होते.कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पाहुणे महापौर सिमा भोळे, विधान परिषद आ. चंदुभाई पटेल, डॉ.शांताराम सोनवणे, जामनेर पोलिस उपअधीक्षक प्रतापजी इंगळे, ग.स.सोसायटी अध्यक्ष मनोज पाटील, नगरसेवक विष्णु भंगाळे, माजी उपमहापौर भारती सोनवणे, बाळासाहेब सैंदाणे, विक्रम गुलाबराव पाटील, आरटीओ नंदुरबारचे राकेश शिरसाठ, विश्‍वनाथ तायडे, जामनेरचे पंढरीनाथ वाघ, गुरुनंदन सुर्यवंशी, नाशिक कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन गांगुर्डे, भुसावळ पं.स. उपसभापती वंदना उन्हाळे, ह.भ.प.विष्णुजी महाराज, मुक्ताईनगरचे रविंद्र कांडेलकर, नानाभाऊ सपकाळे, पुण्याचे लक्ष्मण सपकाळे, वरणगावचे सुपडू पहेलवान, महिला अध्यक्ष निकीता सोनवणे, उषा पाटील, हेमलता सोनवणे, वत्सला सोनवणे, भास्कर पाटील, प्रदिप सोनवणे भुसावळ, सुनय कोळी भुसावळ, शांताराम बाविस्कर कल्याण, संतोष सोनवणे-वेल्हाळे, मुक्ताईनगरचे आत्माराम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी आमदार लता सोनवणे यांचा संस्थेच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. कोळी समाजातील विवाह इच्छूक उमेदवाराची माहिती असलेली साप्ताहिक दिव्य प्रहार वृत्तपत्राचे अनावर यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. परीचय मेळाव्यात २७९ युवती व १०० युवक अशा एकुण २७९ उमेदवारांनी परिचय करुन दिला. मेळाव्यात ६३५ वधु-वरांची नोंदणी करण्यात आली.मेळाव्यात नऊ जोडप्याची लग्न जुळली. याप्रसंगी बोलताना शांताराम सोनवणे म्हणाले की, हा मेळावा विवाह जोडणीसाठी घेण्यात येतो, परंतु विवाहानंतर काही शुल्क कारणांमुळे वधु-वरांमध्ये घटस्फोटाची वेळ येते. असे होऊ नये यासाठी समाजाने विचार विनिमयाने विवाह निश्‍चित केले पाहिजे. प्रत्येक समाजाच्या कार्यक्रमात मुलगा नोकरीवाला आणि निर्व्यसनी असावा ही मागणी युवतींची असते. पण कमी शिकलेल्या मुलींनी कंपनीत जाणार्‍या किंवा चांगला शेती कराणारा मुलाची अपेक्षा ठेवावी. तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष नात्याने आतापर्यंत आम्ही समाजातील बरेच वधु-वरांची तंटे मिटविले आहेत, असे म्हणाले.आ. रमेश पाटील म्हणाले, समाज एकत्र येण्यासाठी अशा वधु-वर मेळाव्याची फार मदत होते. आम्ही कोळी महासंघाच्या माध्यमातुन समाजाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी व समाज संघटनेसाठी खुप परीश्रम घेत आहोत. मुलगा गरीब किवा शेतकरी असला तरी चालेल परतू परिस्थिती बदलण्याची ताकद त्याच्यात हवी. ‘मुलगी शिकली प्रगती झाली’ त्यामुळे मुलीचे शिक्षण महत्वाचे आहे. ही संस्था गेल्या १० वर्षांपासून कार्य करीत असून आतापर्यंत १२०० विवाह जुळले आहेत. तसेच मुकेशभाऊ हे समाजाला चालना देणार व्यक्तिमत्त्व असून कोळी समाजाला यामुळे चालना मिळेल. संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच मध्यप्रदेश, गुजरात या ठिकाणाहून जास्तीत जास्त संख्येने समाज बांधवांची उपस्थिती असते. समाजाच्या समस्या जसे टोकरे कोळी, महादेव कोळी, जातीचा दाखला यासाठी गेल्या २५ वर्षांपासून प्रयत्न करीत आहोत. समाजाचे आमदार समाजाच्या पाठीशी सदैव उभे राहतील.प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष मुकेश सोनवणे म्हणाले की, दोन परिवारांना एकत्र गुंफण्याचा आनंदी क्षण आज सालाबादाप्रमाणे श्री माता मनुदेवी बहुउद्देशिय संस्था तथा आदिवासी कोळी महासंघ तथा राष्ट्रीय आदिवासी कोळी समाज संघटनाच्या माध्यमातून जुळून येत आहे. संस्थेच्या माध्यमातून २१ वधु-वरांचे सामुहिक विवाह घेण्याचे नियोजन केले आहे.यशस्वीतेसाठी नामदेव सोनवणे, वासुदेव सोनवणे, रामचंद्र सोनवणे, बाबुराव सपकाळे, कडुभाऊ कोळी, संदिप कोळी, सुभाष सोनवणे, राजू सोनवणे, गोपाल सपकाळे, खेमचंद सपकाळे, जगदीश कोळी, किशोर कोळी, पंढरीनाथ पाटील, चंद्रशेखर साळुंखे, देविदास कोळी, दत्तु कोळी, प्रमोद बाविस्कर, योगेश बाविस्कर, किरण सोनवणे, संतोष कोळी, प्रकाश बोरसे, रघुनाथ कोळी, निलेश तायडे, भगवान सपकाळे, राजु जाधव, दत्ता तायडे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन थोरात यांनी केले व आभार नामदेव सोनवणे यांनी मानले.

Protected Content