Home राजकीय गृहमंत्री पदासह अजित पवार होणार उपमुख्यमंत्री ?

गृहमंत्री पदासह अजित पवार होणार उपमुख्यमंत्री ?


Ajit Pawar

मुंबई, वृत्तसंस्था | महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीच्या सरकारचा उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. कोणत्या पक्षाकडे किती मंत्रिपदे जातील यावर यापूर्वीच एकमत झाले आहे. मात्र कोणत्या आमदाराला कोणते मंत्रिपद मिळेल याबाबत उत्सुकता कायम आहे. ज्या गृहमंत्री पदावरून तू-तू , मै-मै सुरु आहे, ते राष्ट्रवादीकडे जाऊन अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह गृहमंत्रीपदाची जबाबदारी येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

 

दरम्यान, मंत्री होण्यासाठी आमची यादी अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. यासोबतच धनंजय मुंडे यांच्याकडे अर्थ, जयंत पाटील यांच्याकडे पाटबंधारे, छगन भुजबळ यांच्याकडे ग्रामविकास आणि जितेंद्र आव्हाडांकडे सामाजिक न्याय मंत्रिपदाची धुरा जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.


Protected Content

Play sound