जळगावात गावठी हातभट्टीवर पोलीसांची धाड; पाच जणांवर कारवाई

Daru parwanan news

जळगाव प्रतिनिधी । रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरीविठ्ठल नगर आणि पिंप्राळा परीसरातील पाच ठिकाणी धाड टाकून साडे तीन हजार रूपयांची गावठी हात भट्टी आणि कच्चे रसायन नष्ट करून पाच जणांविरोधा कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, हरीविठ्ठल नगर व पिंप्राळा परीसरात अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू बनविणे व व्रिकी होत असल्याची माहिती रामांनद नगर पोलीसांना मिळाली. त्यानुसार शनिवारी पोलीसांनी धाड टाकून धन्नो यशवंत नेतलेकर कडून 500 रूपये किंमतीची 10 लीटर गावठी हात भट्टी दारू, गोपाळ सोनू कोळी याच्याकडून 700 रूपये किंमतीच 13 लिटर दारू, राजू गोविंदा पारधे रा. मढी चौक पिंप्राळा याच्याकडून 900 रूपये किंमतीची 20 गावठी दारू, ममता सोहम बाटुंगे रा. हरी विठ्ठल नगर या महिलेकडून 750 रूपये किंमतीची 15 लीटर दारू आणि पार्वताबाई राजू भदाणे रा. राजीव गांधी नगर या महिलेकडून 650 रूपये किंमतीची 13 लीटर दारू जप्त करण्यात आली. जप्त केलेली 3 हजार 500 रूपयांची 71 लीटर दारू नष्ट करण्यात आली आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रोहीदास ठोबरे, पीएसआय कांचन काळे, एपीआय मनोज राठोड, विलास पवार, विजय जाधव, संतोष गिते, ज्ञानेश्वर कोळी, दिव्या छाडेकर, महिला होमगार्ड उज्ज्वला पाटील आणि अतुल पवार यांनी कारवाई केली. पाचही जणांवर रामानंद नगर पोलीसात कारवाई करण्यात आली आहे.

Protected Content