डिझेलची चोरी : यावल पोलिसात गुन्हा दाखल

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चिंचोली येथील मोबाईल टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील चिंचोली गावाच्या शिवारातील असलेल्या सखुबाई एकनाथ कोळी यांचे शेत गट नंबर२/२ मधील एका खाजगी कंपनीच्या मोबाईल टॉवर मधील जनरेटरचे सुमारे आठ हजार रुपये किमतीचे१५० लिटर डिझेल दिनांक ४ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारीच्या दरम्यान दुपारी साडेबारा वाजेपर्यंत अज्ञात चोरट्याने डिझेल चोरून नेले आहे.

या संदर्भात मोबाईल टावर चे कर्मचारी योगेश गणेश चौधरी यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात भादंवी कलम३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास येथील पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ सहायक फौजदार अजिज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास यावल पोलीस करीत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content