कालिचरण बाबावर गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी दाखल केला गुन्हा

मुंबई वृत्तसंस्था | महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणारे तथाकथित संत कालिचरण याच्यावर गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या फिर्यादीवरून नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण उदात्तीकरण करत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर तथाकथित संत कालिचरण याने रायपूरात झालेल्या धर्मसंसदेत आक्षेपार्ह टीका केली होती. ‘कालिचरण याने अशी टीका करून देशवासियांचा अवमान केला’ असल्याचे म्हणत डाॅ.जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

आपल्या विधानाच्या समर्थनाबरोबर वाटेत येणाऱ्या लोकांना कापून टाकण्याची धमकी दिली देत आधीही कालिचरण बाबाने धार्मिक द्वेष पसरवणारी भाषणे केली असल्यामुळेच आपण नौपाडा पोलीस ठाण्यात जाऊन कालिचरण बाबांबरोबर भादंवि 294, 295(अ), 298, 505(2), 506, आणि 34 ( 34) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.” असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

Protected Content