अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त शिबीरात पोलीस दलातर्फे मार्गदर्शन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून २६ जून हा दिवस साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधत जिल्हा पोलिस दलाच्या वतीने उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात आयोजीत करण्यात आलेल्या शिबीरात सहाय्यक पोलीस निरीक्षक जालींदर पळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

जिल्हा पोलिस दलाच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात एनसीसी, १८ महाराष्ट्र बटालियन कार्यक्षेत्रातील विद्यालय आणि महाविद्यालयातील ४५० विद्यार्थी – विद्यार्थिनींचा सहभाग असलेले दहा दिवसाचे वार्षिक प्रशिक्षण घेण्यात आले होते. या शिबीरात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरिक्षक जालिंदर पळे पळे यांनी उपस्थित विद्यार्थी वर्गाला मार्गदशन केले.

 

याप्रसंगी सपोनि जालींदर पळे यांच्यासह सहायक फौजदार रमेश जाधव, हेकॉ सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, महेश महाजन, 18 महाराष्ट्र बटालीयन जळगावचे कर्नल प्रविण धिमन, लेफ्टनंट कर्नल पवन कुमार, कोमलसिंग, सुनील पालवे, जय बहादुरसिंग, नरेंद्र सिंग, शैलेंद्र कुमार, प्रदिप कुमार, ककलीज, बलवान सिंग, राजु राम, महिपाल सिंग, गुलझार अहमद, सतिष कुमार, अरुण कुमार, मेजर डॉ. अरुण वळवी, लेफ्टनंट शिवराज पाटील, चिफ ऑफीसर डी. एस. पाटील, युवराज पाटील, तृष्णा तळेले, दिपाली खडके यांची उपस्थिती होती.

Protected Content