मुक्ताईनगरात श्रीराम नवमी जन्मोत्सव साजरा (व्हिडीओ)

मुक्ताईनगर प्रतिनिधी । यंदा रामनवमीनिमित्ताने मुक्ताईनगर शहरात प.पु.गुरुवर्य संतश्रेष्ठ श्रीराम पुजारी बाबासेवा भावी ट्रस्ट संचलित रामरोटी आश्रम हि सेवाभावी संस्था 14 वर्षांपासून शहरातील सर्व सामाजिक संस्था व रामभक्त सेवकांना सोबत घेऊन संयुक्तपणे रामनवमी जन्म उत्सव सोहळा साजरा केला.  

यावेळेस श्रीराम जन्मोत्सव हा डॉ योगेश राणे दादा वैद्यकीय अधीक्षक उप जिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर यांच्या मार्गदर्शनाखाली महारक्त दान उत्सव साजरा केला गेला. कोरोना महामारीच्या संकटात संपुर्ण राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे तेव्हा अशा बिकट प्रसंगी स्वयंस्फूर्तीने कोरोनाचे  नियम पाळून स्वतः रक्तदानासाठी सर्व रामभक्तांनी स्वयंशिस्तीने या मानवतावादी कार्यात रामरोटी आश्रम जुने गाव मुक्ताईनगर येथे सहभाग नोंदवीला. 

आश्रमाच्या आवाहन अनुसार  या दिवशी ज्यांना रक्तदान शिबीरात प्रत्यक्ष सहभाग घेता आला  नाही त्यांनी घरातुनच कोरोना महामारीच्या संकटात अडकलेल्या आपल्या भारताला व संपुर्ण जगाला सुखरूपपणे बाहेर पडण्यासाठी व आपल्या सर्वांना वाचवण्यासाठी अहोरात्र धडपडत असलेल्या डॉक्टर नर्स वैद्यकीय कर्मचारी स्वच्छतादूतआणि पोलीस यंत्रणा या सर्वांच्या मेहनतीस यश व त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रभू श्रीरामांना साकडे घालून त्यांच्या मानव सेवेच्या कार्यास शक्ती मिळण्यासाठी आश्रमा कडुन सामुदायिक प्रार्थना या उपक्रमात दुपारी-12:00 स्वत चे घरी रामरक्षा व श्री रामनाम जप केला गेला.

यावेळी महंत आजाद गिरी महाराज, हभप रविंद्र हरणे महाराज, हभप रतीराम महाराज, किशोर गावंडे अध्यक्ष रामरोटी आश्रम, रोहीनी ताई खेवलकर, रामभाऊ टोंगे, गजानन पाटील, छोटु भोई, प्रविन चौधरी (आमदार स्विय सहायक) वीरेंद्र भोईटे, वसंत भलभले (शिवसेना शहर संघटक) पुरषोत्तम वंजारी, निवृत्ति पाटील, किरण महाजन, पवन सोनवणे, डॉ. विवेक सोनवने, रघुनाथ पाटील, गजानन मालगे, ललीत महाजन, सुभाष माली, शुभम तलेले, पंकज कोली, आकाश सापधरे, गणेश टोंगे, राजु तलेले, अंकित सापधरे, प्रमोद सोनवने, पवन खुरपडे, राहुल पाटील वकील, नीरज बोराखेडे, राहुल काले, धनंजय सापधरे, विजय पोलाखरे, बाला चिंचोले, गणेश भोई, चेतन पाटील, सागर भोजने यांनी उपस्थिती देवुन मानवजातीच्या रक्षणासाठी 73 रक्त दात्यांनी रक्तदान करुन अमूल्य सहभाग नोंदवीला आहे. 

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय हॉस्पिटल रक्त पेढ़ी संचलक लक्षण पाटील यांनी व त्यांचे सहकारी यांनी संकलीत केले. या कार्यक्रमास श्रीराम सेना मुक्ताईनगर यांचे विषेश सहकार्य लाभले.

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.